

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) हार्पर बाजार मासिकासाठी तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसलेली हुमा काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना त्याचे फोटो खूप आवडतात. हुमाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. (Huma Qureshi)
हुमा कुरेशीने तिच्या मॅगझिन फोटोशूटचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या चित्रात ती खुर्चीवर बसलेली दिसते. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "I enjoy the glamour, I love dressing up and walking the red carpet and looking beautiful, and all of that. But there has to be more to it. I cannot be just another pretty girl who came and went because there will always be someone prettier…" —Huma Qureshi
Bazaar India's covergirl, Huma Qureshi (@iamhumaq), wants to leave an impact with a legacy that goes beyond money, fame, and glamour. In a special conversation, Huma speaks about reclaiming her power with her views on body confidence, life, and more…
तिच्या दुसऱ्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हुमा कुरेशी खूप हॉट पोज देताना दिसत आहे. या फोटोतही ती काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांनी बेंचवर बसल्याची पोज दिली आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला ग्लॅमर आवडते, मला ड्रेस अप करायला आणि रेड कार्पेटवर फिरायला आणि सुंदर दिसायला आवडते. पण त्यात अजून बरेच काही असले पाहिजे.. मला फक्त एक सुंदर मुलगी व्हायचे नाही जी आली आणि गेली कारण तिथे नेहमीच कोणीतरी सुंदर असेल …"
या सर्व फोटोंमध्ये हुमा कुरेशी तिचा मनमोहक परफॉर्मन्स दाखवताना दिसत आहे. हे पाहून चाहत्यांसोबतच बॉलिवूड स्टार्सनाही नजर हटवता येत नाहीये. हुमा कुरेशीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. हुमाच्या पोस्टला तासाभरात ३५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हुमा सध्या तिच्या आगामी राजकीय नाटक मालिका महाराणी सीझन २ मध्ये बिझी आहे. नुकताच तिचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. ज्यामध्ये हुमा अतिशय शानदार अभिनय करताना दिसली. या मालिकेत हुमा बिहारची मुख्यमंत्री असलेली भारतीची भूमिका साकारणार आहे. हे २५ ऑगस्टला रिलीज होईल.