पॅन कार्ड आधाराशी जोडण्याची ‘ही’ शेवटची तारीख! SMSने पॅन-आधार असे करा लिंक

पॅन कार्ड आधाराशी जोडण्याची ‘ही’ शेवटची तारीख! SMSने पॅन-आधार असे करा लिंक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता ३१ मार्च २०२३ हे अखेरची तारीख असणार आहे. जर या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. (PAN Aadhar Link)

आयकर कायद्यानुसार पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे पॅन कार्ड आधारशी लिंक नसतील ते १ एप्रिलपासून निष्क्रिय होणार होतील, असे आयकर विभागाने एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. सरकारने SMSच्या साहायाने पॅन कार्ड आधारशी जोडण्याची सुविधा दिलेली आहे.

SMSने पॅन कार्ड आधार कार्डशी कसे जोडावे?

1. SMS अॅप ओपन करून त्यात UIDPAN असे टाईप करा
2. त्यानंतर स्पेस देऊन १२ अंकी आधार नबर टाईप करा. त्यानंतर पुन्हा स्पेस द्या १० अंकी आधार नंबर टाईप करा.
3. हा मेसेज नंतर 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.
4. नंतर पॅन कार्ड आधारशी जोडल्याचा मेसेज येईल.

ऑनलाईन प्रकारे PAN कार्ड आधारशी कसे जोडावे?

1. eportal.incometax.gov.in किंवा incometaxindiaefiling.gov.in या पैकी कोणतीही लिंक ओपन करा.
2. या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा. PAN किंवा आधार यूजर आयडी म्हणून सेट होईल.
3. यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्म तारीख वापरून लॉग इन करा.
4. त्यानंतर Quick Links मध्ये जा.
5. तेथे Link Aadhar हा पर्याय निवडा
6. पॅन आणि आधार नंबर टाईप करा.
7. त्यानंतर CAPTCH व्हेरिफाय करा.
8. पॅन आणि आधार जोडला गेल्याची नोटिफिकेशन येईल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news