हिंदूस्तान ही हिंदी भाषेची भूमी नाही : जग्गी वासुदेव यांचे नितीश कुमारांना प्रत्त्युत्तर
पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. तुम्हाला ती समजलीच पाहिजे, असे द्रमुक नेत्यांना सुनावणार्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना सदगुरु जग्गी वासुदेव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Nitish Kumar Hindi remark row)
जग्गी वासुदेव यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "हिंदुस्थान ही हिमालय आणि इंदू सागर यांच्यामध्ये असलेली भूमी आहे. हिंदूंची भूमी म्हणजे हिंदी भाषेची भूमी नाही. देशातील राज्यांची भाषिक विभाजनाचा हेतू भारतातील सर्व भाषांना समान दर्जा मिळावा हा होता. ती भाषा किती लोक बोलतात याला महत्त्व नव्हते."
Nitish Kumar Hindi remark row : अशी क्षुल्लक विधाने करणे टाळा
आपल्याला आदरपूर्वक विनंती करतो की आपण अशी क्षुल्लक विधाने टाळा. भारतात अनेक राज्ये आहेत. ज्यांची स्वतःची भाषा, साहित्य आणि संस्कृती त्यांच्याशी संबंधित आहे, असेही जग्गी वासुदेव यांनी नितीश कुमारांना सुनावले आहे. ( Nitish Kumar Hindi remark row )
काय म्हणाले होते नितीश कुमार ?
भाजपविरोधी इंडिया आघाडीची बैठक मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दिल्लीत झाली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या भाषणाचे भाषांतर करावे, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते टीआर बालू यांनी केली. यावर नितीश कुमार चांगलेच भडकेले. ते म्हणाले "आम्ही आमच्या देशाला हिंदुस्थान म्हणतो. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आपल्याला कळली पाहिजे." या वेळी नितीश कुमार यांनी मनोज झा यांना त्यांच्या भाषणाचे भाषांतर करु नये, असे स्पष्ट केले होते.
हेही वाचा :
- Ayodhya Ram Temple : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा, विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण
- Telecom Bill 2023 : बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे जेल, ५० लाख दंड; टेलिकम्युनिकेशन विधेयक लोकसभेत मंजूर
- Death Penalty for Mob Lynching : मॉब लिंचिंग प्रकरणी दोषी आढळल्यास होणार फाशी, अमित शहा यांची लोकसभेत माहिती

