पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी आघाडीच्या विरोधी नेत्यांना निमंत्रण करण्यात आले आहे. ( Ram Temple inauguration in Ayodhya )
विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मनमोहन सिंग, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रमुख देवेगौडा यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. ( Ram Temple inauguration in Ayodhya )
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत होणार्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. 'प्राण प्रतिष्ठा' पूजा १६ जानेवारीला प्रारंभ होणार असून त्याची सांगता 22 जानेवारी रोजी होणार आहे.
हेही वाचा :