High heels and belt bag : तरुणींच्या सौंदर्यात भर घालणारी हायहिल्स

High heels and belt bag
High heels and belt bag
Published on
Updated on

– मृणाल सावंत

अनेक घटक तरुणींच्या सौंदर्यात भर घालतात. त्यात हायहिल्स (High heels and belt bag) आणि बेल्टबॅगचा मोठा सहभाग आहे. सुंदर टॉप, पेन्सिल जिन्स, उठावदार इयररिंग्ज असेल आणि पायात मात्र साधी चप्पल किंवा स्लिपर असेल तर त्या तरुणीचे व्यक्तिमत्त्व फारसे उठावदार दिसणार नाही. त्यासाठी हिल्स किंवा हायहिल्सचा सहभाग असायला हवा. मग मात्र व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.

पायाला भल्या मोठ्या शिड्या लावून चारचौघात मिरवणं म्हणजे तमाम महिला वर्गाचा एक स्टेटस सिम्बॉल. हायहिल्सबरोबर (High heels and belt bag) व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी उपयोग होतो तो बेल्ट बॅगचा. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बॅग्जबरोबरच बेल्ट बॅगच्या वापरानेही तितकाच रिच लूक येऊन जातो. ट्रेकिंग, लांबचा प्रवास, जिम,मॉर्निंग वॉक किंवा अगदी बाजारात शॉपिंगला जरी जायचे असेल तर मोबाईल, पैसे, सामानाची यादी, प्रवासाची तिकिटे यासारखे साहित्य ठेवण्यासाठी साईड पाऊचचा चांगला उपयोग होतो. सध्या त्याची जोरदार फॅशन आहे. मुलींच्या बॅग्जमध्ये खूप व्हरायटी आहेत. पण, या बेल्ट बॅगनेही आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

मुलांबरोबर मुलींकडेही हे बेल्ट बॅग वेगवेगळ्या ढंगात पहायला मिळते. (High heels and belt bag) साईट बॅग्ज, रकसॅक, कंबरेला बांधायचे साईट पाऊच, बेल्टस असे प्रकार आढळतात. कंबरेला बांधायच्या साईड पाऊचमध्ये सध्या चांगलेच वैविध्य पहायला मिळते. ही फॅशन फक्त कॉलेजियन्समध्ये नाही तर ट्रेकर्स, जिमला जाणार्‍या मंडळीतही लोकप्रिय ठरतेय. घराची किल्ली, रुमाल किंवा नॅपकीन, मोबाईल, काही पैसे,चॉकलेटस् असे साहित्य सहज मावू शकते. यात ट्रेनची किंवा बसची तिकिटे, छोटा डिजिकॅम, टॉर्च, सुरी, एखादे छोटे फळही सहज मावू शकते. त्यामुळे सौंदर्यात भर घालताना हायहिल्सबरोबर बेल्ट बॅगही महत्त्वाची ठरते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news