Blood pressure | ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी श्वसनाचे ‘हे’ व्यायाम करा, मिटेल टेन्शन, जाणून घ्या कसे?

उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उच्च रक्तदाब ही जगभर वाढत चाललेली गंभीर समस्या आहे. दिवसेंदिवस या भयंकर आजारात मोठेच नाहीत, तर लहान मुलेही ओढली जात आहेत. पूर्वी उच्च रक्तदाब ही समस्या ठराविक वयानंतर होत होती. पण बदत्या काळानुसार, ही आरोग्याची समस्या प्रत्येकाला आपल्या विळख्यात ओढताना दिसत आहे. उच्च रक्तदाबाच्या आजारात लोक नेहमी औषधांचाच वापर करतात, पण लोकांना हे माहित नाही की, योग आणि व्यायामाच्या साहाय्यानेही आपण उच्च रक्तदाबासारख्या (High Blood pressure) गंभीर समस्येला रोखू शकतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, दररोज श्वसनाचे व्यायाम करण्याने उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते. नॅशनल पब्लिक रेडिओमध्ये प्रसिद्ध आलेल्या एका रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार असेही सांगण्यात आले आहे की, पोटाचे आणि श्वसनसंस्थेचे व्यायाम केल्याने उच्च रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच या व्यायामुळे हदयाला (Blood pressure) देखील आराम मिळतो.

कोलोराडो युनिव्हर्सिटीचे फिजियोलॉजिस्ट डॅनियल क्रेगहेड यांचे असे मत आहे की, आपण काही मांसपेशींचा उपयोग हा श्वसन घेण्यासाठी करतो. इतर मांसपेशी या वय वाढवण्यासोबतच श्वास घेण्यासाठीही मदत करतात, त्यामुळे त्यांनी PowerBreath नावाचे एक श्वास घेण्यासाठी मदत करणारे उपकरण तयार केले. यासाठी हे उपकरण वापरून १८ ते ८२ वर्षांपर्यतच्या व्यक्तींमध्ये व्यायाम करताना असे लक्षात आले की, ते श्वास घेताना त्यांच्या मांसपेशींचा उपयोग करतात.

PowerBreath : श्वसनासाठी या उपकरणाचा वापर

या अभ्यासात पुढे असे दिसून आले की, ६ महिने प्रत्येक दिवशी ३० वेळा श्वसनाचे व्यायाम केल्यानंतर, ब्लड प्रेशर मशिन हे जवळपास ९ मिमी पर्यंत खाली आलेले दिसले. तुम्ही या उपकरणाचा उपयोग धावताना, सायकल चालवताना किंवा चालताना देखील करू शकता. पुढे असेही सांगण्यात आले आहे की, या उपकरणाचा वापर हा अगदी सहज पद्धतीनेही करता येऊ शकतो.

कमी वेळेत मिळतात उत्तम फायदे

क्रेनहेड यांनी सांगितले आहे की, या उपकरणाचा वापर केल्यास, यापासून कमी वेळेत मिळतात उत्तम फायदे मिळू शकतात. यामुळे मांसपेशींची चांगल्या पद्धतीने हालचाल होते. या संशोधनाला राष्ट्रीय आरोग्य संस्थेने फंडदेखील दिला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news