व्हिटॅमिन-बी12 ची पातळी तपासा डॉक्टरांचा सल्ला; अनेक किशोरवयीन मुलांमध्ये कमतरता

व्हिटॅमिन-बी12 ची पातळी तपासा डॉक्टरांचा सल्ला; अनेक किशोरवयीन मुलांमध्ये कमतरता
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमी पातळी दिसून येते. त्याची कमतरता दूर करण्यासाठी मशरूम, चिकन, अंडी, बदाम आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.

'व्हिटॅमिन बी 12'च्या कमतरतेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, जसे की अ‍ॅनिमिया, शरिरात जळजळ, थकवा, बधीरपणा किंवा हाता-पायांना मुंग्या येणे. त्यामुळे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या पातळीचे वेळोवेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे, ते सामान्य आणि शिफारस केलेल्या श्रेणीत आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.

प्रत्येकाच्या शरीरात व्हिटॅमिन डी, जस्त, लोह किंवा कॅल्शियमची पातळीप्रमाणेच बी 12 चीदेखील योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. आज, बहुसंख्य किशोरवयीन मुलांमध्ये बी 12 ची कमतरता आहे, ज्यामुळे ते गंभीर संकटात सापडू शकतात.

शरीर पुरेसे व्हिटॅमिन शोषून घेत नाही तेव्हा…

लाल रक्तपेशी, डीएनए आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे म्हणजे हात, पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, चालण्यास असमर्थता, अशक्तपणा, जिभेवर सूज येणे, शरीरात जळजळ, आरोग्य समस्या, थकवा, चिडचिड, भूक कमी होणे, शारीरीक हलचाली दरम्यान स्नायूंचा आवाज होणे, उदासीनता, उलट्या, अतिसार, हायपरपिग्मेंटेशन, शारीरिक विकास मंदावणे आणि थकवा. जेव्हा शरीर पुरेसे व्हिटॅमिन शोषून घेत नाही किंवा साठवत नाही किंवा एखाद्याला त्याची पुरेशी मात्रा मिळत नाही तेव्हा व्हिटॅमिन बी 12 कमतरता निर्माण होऊ शकते.

बी 12 ची कमतरता ही सर्वात दुर्लक्षित समस्यांपैकी एक आहे. चुकीचा आहार, फास्ट फूडचे सेवन यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता वाढत आहे.
– डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news