

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला क्रीडा प्रशिक्षकाने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपप्रकरणी चंदीगड पोलिसांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संदीप सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ( Sandeep Singh Resigns ) माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. चौकशीत सत्य समोर येईल. या प्रकरणी संपूर्ण चौकशी होईपर्यंत नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा देत असल्याचे संदीप सिंह यांनी म्हटलं आहे.
एका महिला प्रशिक्षकाने संदीप सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोप केला आहे. १ जुलै २०२२ रोजी संदीप सिंह यांनी मला भेटायला बोलवले. नोकरीसाठी शिफारस करतो;पण या आधी तुला माझी गर्लफ्रेंड व्हावी लागेल, असेही त्यांनी म्हटले. संदीप सिंह यांच्या निवासस्थानाबाहेरच हा प्रकार घडला. त्यांच्या निवासस्थानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी, अशी मागणी करत यानंतर क्रीडामंत्री इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करत होते. हे सर्व पुरावे आपण पोलिसांना सादर करणार असल्याचेही पीडितेने प्रसार माध्यमांसमोर बोलताना म्हटले होते. याप्रकरणी संदीप सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
याप्रकरणाच्या चोकशीसाठी हरियाणा सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत मी क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे संदीप सिंह यांनी जाहीर केले.
हेही वाचा :