Kabul Military Airport : काबूलमधील लष्करी विमानतळाबाहेर स्फोट | पुढारी

Kabul Military Airport : काबूलमधील लष्करी विमानतळाबाहेर स्फोट

पुढारी ऑनलाईन डेस्क : काबूलमधील लष्करी विमानतळाबाहेर (Kabul Military Airport)  आज (दि.१) सकाळी स्फोट झाल्याची माहिती तालिबान संचालित अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला दिली. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी सांगितले की, आज सकाळी काबूल लष्करी विमानतळाबाहेर (Kabul Military Airport)  स्फोट झाला. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तपास सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी उत्तर तखार प्रांताची राजधानी तालुकन शहरात स्फोट झाला होता. स्थानिक प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या डेस्कखाली बॉम्ब ठेवून हा स्फोट घडवून आणला होता. यात ४ जण जखमी झाले होते. त्यानंतर आता विमानतळाबाहेर स्फोट करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button