HBD Shamita : वरून उडी मारली तरी दोघींचं फोनवर बोलणं संपणार नाही

HBD Shamita : वरून उडी मारली तरी दोघींचं फोनवर बोलणं संपणार नाही
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

'मोहब्बतें' चित्रपटातून अभिनय करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिचा आज २ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये ती दिसली होती. शमिताचं चित्रपट करिअर काही खास झालं नाही. फ्लॉप बॉलीवूड करिअरवर शमिताने एका मुलाखतीत सांगितलं होत की, डेब्यूनंतर तिने चुकीचे चित्रपट निवडले. याची आतापर्यंत तिला खंत आहे. जसं शिल्पा शेट्टी करिअरच्या यशाच्या शिखरावर पोहोचली. तशा प्रकारे शमिताचं करिअर बहरलं नाही. पण, शमिता आणि शिल्पा या दोन्ही बहिणींमध्ये इतकं प्रेम आहे की, दोघी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. दोघी एकमेकींचे कपडे घालतात आणि तासनतास मोबाईलवर बोलत बसतात. ( Shamita Shetty)

बॉलीवूड अभिनेत्री शमिताचा जन्म २ फेब्रुवारी, १९७९ मध्ये मंगळूरमध्ये झाला. ती प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहिण आहे. त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊया… तिच्या आयुष्याशी संबंधित या खास गोष्टी.

शमिताला बालपणापासूनच फॅशनची आवड होती. आपली आवड पूर्ण करण्यासाठी तिने पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबईतील एसएनडीटी कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत एकत्र कामदेखील केलं होतं. फॅशन डिझायनिंग नंतर शमिताने इंटीरिअर डिझायनिंग दुनियेत पाऊल ठेवलं. इंटीरियर डिझायनिंगची दुनिया चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ती लंडनच्या सेंट्रल मार्टिन्स ॲण्ड इंचबाल्ड स्कूल ऑफ डिझाईनमध्ये प्रवेश घेतला. तिने मुंबईतील क्लब 'रॉयल्टी', 'चंडीगढ लॉसिस स्पा' डिझाईन केलं आहे. तिला या कामासाठी अनेक ॲवॉर्ड्सदेखील मिळाले आहेत.

IIFA अवॉर्ड

शमिताने २००० मध्ये आदित्य चोप्राचा चित्रपट 'मोहब्बतें'मधून आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, उदय चोप्रा, जिमी शेरगिल, जुगल हंसराज, किम शर्मा, प्रीति झिंगियानी यासारखे कलाकार देखील होते. या चित्रपटासाठी शमिताला स्टार डेब्यू ऑफ द ईयरचा IIFA ॲवॉर्डदेखील मिळाला होता. 'जहर' और 'बेवफा' मध्ये शमिताच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. शमिता एक चांगली डान्सरदेखील होती. चित्रपट 'मेरे यार की शादी है' मधून तिचा डान्स नंबर 'शरारा शरारा' खूप लोकप्रिय ठरला होता. तिने हिंदी चित्रपटांशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

वेब सीरीज में किया डेब्यू

चित्रपटांशिवाय शमिताने अनेक रिॲलिटी शोजमध्ये आपले नशीब आजमावलं आहे. ती 'बिग बॉस' आणि 'झलक दिखला जा सीजन ८' मध्ये दिसली होती. याशिवाय ती 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन ९' च्या फायनलमध्येही पोहोचली होती. ती झी ५ ची वेब सीरीज 'Black Windows' मध्ये दिसली होती. शमिताने अनेक ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत.

बहिणी-बहिणींमध्ये खूपचं प्रेम

आश्चर्याची बाब म्हणजे शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या लग्नानंतर शमिता एका महिन्यासाठी डिप्रेशनमध्ये गेली होती. या गोष्टीचा खुलासा स्वत: तिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला होता. शमिताने सांगितलं होतं की, ती शिल्पाच्या लग्नावेळी खुश होती. पण, नंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

शमिताने 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितलं होतं की, "जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, तेव्हा मला वाटत होतं की, मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी खुश होते, पण मी एका महिन्यासाठी डिप्रेशनमध्ये होते. कारण, जेव्हा शिल्पा घरात असायची, तेव्हा ती जोरजोरात हसायची. त्यावेळी मला तिची खूप आठवण येत होती."

शमिता शेट्टीने याविषयी बोलताना सांगितलं होतं की, तिचं लग्न झालंय, हे स्वीकारायला मला खूप वेळ लागला होता. तर कपिल शर्मा शोमध्ये राज कुंद्राने शिल्पा-शमिता यांच्याविषयी सांगितलं होतं की, दोघी बहिणींच्या इतक्या गप्पा रंगतात की, आजूबजूला काय चाललंय याचं देखील भान राहत नाही. राज कुंद्राने मिश्किल अंदाजात सांगितलं होतं की, मी इमारतीवरून उडी जरी मारली तरी या दोघींचं फोनवरील बोलणं संपणार नाही. तासनतास फोनवर गप्पा रंगतात. दोघी एवढ काय बोलतात, कुणास ठाऊक?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news