

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या गुढी पाडव्याला कडूनिंबाच्या चटणीसोबत मस्त कच्ची कैरी-हरभरा डाळीची चटणी (Kairi Chana Dal Chutney) घरच्या घरी करा. यासाठी घरगुती साहित्य वापरून आरोग्यदायी चटणी तयार करा. हरभरा किंवा चणा डाळीत प्रथिने भरपूर असतात. अँटीऑक्सिडंट गुणदेखील डाळीत असतात. डाळ नियमित खाल्ल्याने वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हरभरा डाळ एक चमचा रोज भिजवून खावावे. जर तुमचे केस तुटत असतील तर नियमितपणे डाळ खाल्ल्यास फायदेशीर आहे. यामध्ये पोषक तत्वे अधिक असतात. (Kairi Chana Dal Chutney)
भिजवलेली चणाडाळ
कैरी किसून – चार ते पाच
मोहरी – एक चमचा
जिरे – एक चमचा
हिंग – चिमुटभर
हिरव्या मिरच्या – २
तेल : २ चमचे
हळद- पाव चमचा
मीठ-चवीपुरते
साखर- चवीपुरते
१) जितकी हवी तेवढी हरभरा डाळ २ तास भिजून ठेवावी.
२) भिजवलेली चणाडाळ, मिरच्या, कैरी, मीठ, साखर एकत्र वाटावे.
३) थोडेसे पाणी घालून किंचित जाड वाटून घ्यावी.
४) एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, जिरे घालून फोडणी टाकावी.
५) ही फोडणी तयार झाल्यावर कैरीच्या चटणीवर घालावी.
६) चमच्याने सर्व मिश्रण मिक्स करावे.
७) ही टेस्टी चटणी गुढीपाडव्याच्या पुरणपोळ्याच्या ताटासोबत खायला तयार आहे.