

पुढारी ऑनलाईन: मालाड परिसरातील एका गार्डनला मविआ सरकारच्या काळात 'टिपू सुलतान' हे नाव देण्यात आले होते. मविआ सरकारच्या काळातील देण्यात आलेले हे नाव बदलण्याचे आदेश शिंदे फडणवीस सरकारमधील मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मविआ सरकारच्या काळात मुंबई मधील एका गार्डनला टिपू सुलतान असे नाव देण्यात आले होते. पण यानंतर या नामकरणाला भाजपने विरोध केला होता. दरम्यान, सकल हिंदू समाजाने यावर अनेकवेळा आंदोलन देखील केले होते. मात्र सध्याच्या सरकारमधील मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना या गार्डनचे नाव बदलण्याचे आदेश दिले आहे, असे स्वत: त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.