गोंदिया
Latest
गोंदिया : पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी नराधमाला १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. किशोर रामू शेंडे (वय ३० रा. मोखे (किन्ही, ता. साकोली, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे. (Gondia Crime News)
काय आहे प्रकरण?
- गोंदिया येथे २३ एप्रिल २०१९ला अल्पवयीन मुलीचे लग्नाच्या मांडवातून अपहरण करून अत्याचार
- आरोपी किशोर रामू शेंडे याच्यावर पोस्कोसह विविध कलमांखाली गुन्ह्यांची नोंद
- साक्षी, पुरावे, आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून शेंडे याला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मानवतेला लाजवेल अशी घटना २३ एप्रिल २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यात घडली. माहितीनुसार, आरोपीने ५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाच्या मंडपातून जवळील शेतात घेऊन जात तिच्यावर अत्याचार करून पसार झाला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात कलम ३६३, ३६६ (ए), ३७६ (ए-बी), ५११, ३५४, ३५४ (ए) भादंवि, सहकलम ८, १२ पोक्सो कायदा The Protection of Children from Sexual Offences Act (POCSO) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीला अटक करून सखोल तपास केला. सर्व साक्ष, पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने हे प्रकरण विशेष प्रकरण म्हणून न्यायालयीन कार्यवाही सुरू केली. (Gondia Crime News)
१० वर्षांचा सश्रम कारावास | Gondia Crime News
सरकारतर्फे सरकारी वकील पारधी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. आरोपींविरुद्ध सर्व साक्ष, पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी आरोपी किशोर शेंडे याला दोषी ठरवत भादंवि कलम ३६३ अन्वये ३ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३५४ अन्वये ३ वर्षे कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास व कलम ३७६ (ए बी) भादंवि अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
या अधिकाऱ्यांनी केला तपास
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लोणकर तिरोडा यांनी केले. न्यायालयीन कामकाज पोलीस हवालदार मोहन भोयर, पोलीस स्टेशन तिरोडा यांनी पाहिले.
हेही वाचा

