आधी बलात्कार नंतर काढले व्हिडीओ; महिलेला ब्लॅकमेल करुन दहा लाखांची मागणी | पुढारी

आधी बलात्कार नंतर काढले व्हिडीओ; महिलेला ब्लॅकमेल करुन दहा लाखांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दोघांनी एका महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. पुढे तेच व्हिडीओ महिलेला पाठवून बदनामी करण्याच्या धमकीने दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी केतन महादेव चौघुले (वय 33, रा. मु. पो. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर), शेखर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या दोघांविरुद्ध बलात्कार, खंडणी, धमकी, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

यातील केतन याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कॅम्प परिसरात राहणार्‍या 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर 2023 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत महिलेचे राहते घर, शिवाजीनगर, नर्‍हे परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विवाहित आहे. मात्र, पतीपासून विभक्त राहते. ती सरकारी नोकरी करते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महिलेची आरोपी केतन याच्यासोबत ओळख झाली होती. त्यातून दोघांचा संपर्क वाढत गेला. केतनने महिलेसोबत विविध हॉटेलमध्ये जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने मित्र शेखर याच्यासोबत देखील महिलेला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. दरम्यान, केतनने नकळत याचे चित्रीकरण करून व्हिडीओ तयार केले. त्यानंतर दोघांनी फोन करून महिलेकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली.

दरम्यान, महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी केतनने महिलेला तुझे व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करेन, अशी धमकी दिली तसेच शिवीगाळ केली. फिर्यादी काम करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन केतनने ते व्हिडीओ महिलेच्या मोबाईलवर पाठविले.
तसेच हे व्हिडीओ तिच्या कार्यालयातील एका कर्मचार्‍याच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस
करत आहेत.

हेही वाचा

Back to top button