

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने दरात (Gold Price Today) आज मंगळवारी पुन्हा तेजी दिसून आली. सोमवारच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) ४९१ रुपयांनी वाढून ४७,४८४ रुपयांवर (प्रति १० ग्रँम दर) पोहोचला. तर चांदीच्या दरात १,०९० रुपयांची (प्रति किलोमागे) तेजी दिसून आली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,४८४ रुपये (प्रति १० ग्रँम) एवढा आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा दर ४७,२९४ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४९५ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ३५,६१३ रुपये आहे. चांदीचा भाव ६३,९७७ रुपये (प्रति किलो) एवढा आहे.
देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढती आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोने ५० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकी डॉलरच्या मुल्यात घसरण झाल्याने सोने दराला झळाळी मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांतून सोन्याला मागणी वाढली आहे.
सोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. सोन्याचा दर ९५० रुपयांनी घसरला होता. तर चांदी तब्बल ४,१०० रुपयांनी स्वस्त झाली होती. आता पुन्हा सोने आणि चांदी भावात तेजी आली आहे.
हे ही वाचा :