गोवा : मुख्यसेवक म्हणून करणार काम ; डॉ. प्रमोद सावंत

गोवा : मुख्यसेवक म्हणून करणार काम ; डॉ. प्रमोद सावंत
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर आपण मुख्यसेवक म्हणून काम करणार आहे. आपले सरकार हे गोमंतकीयांचे सरकार असेल. प्रत्येक गोमंतकीयांना हे सरकार आपले आहे असे वाटावे, असे काम पुढील पाच वर्षांत केले जाईल. अंत्योदय तत्त्वावर स्वयंपूर्ण गोवा 2.0 अभियानाच्या माध्यमातून आपल्या सरकारचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

डॉ. सावंत व त्यांचे मंत्रिमंडळ सोमवारी (दि.28) रोजी शपथ घेणार आहे. शपथविधीच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गोमंतकीयांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. विविध माध्यमातून रोजगारनिर्मिती करून बेरोजगारी दूर करणे, पर्यटनक्षेत्रात राज्याला सर्वोच्च स्थानी नेणे, स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत प्रशासन पोचवून त्यांंना सरकारी योजनांचा लाभ देणे, आदी कामे आपले सरकार करणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर आपणास पक्षाने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. 2014 पासून केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. सर्व नागरिकांना सोमवारचा सरकारचा शपथविधी खुला आहे. ज्यांना पास मिळाले नाहीत, त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या बाहेर उपलब्ध पास घेऊन आत यावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news