गोवा निवडणूक : विधानसभा बरखास्त

Goa Legislative Assembly
Goa Legislative Assembly

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभा बरखास्तीचा आदेश शनिवारी जारी केला. विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मंत्रिमंडळाने केली होती. आता राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावल्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. विधानसभेची मुदत 15 मार्च रोजी संपत होती. विधानसभेवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिध्द केल्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला.

विश्वजित राणे भेटले

भाजप विधिमंडळ गटनेता अद्याप ठरला नसतानाच माजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा राजभवनवर जाऊन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. बरेच दिवस ते राज्यपालांना भेटले नव्हते.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news