Goa Election : विरेश बोरकर ठरले सर्वात तरुण आमदार

Goa Election : विरेश बोरकर ठरले सर्वात तरुण आमदार

पणजी: पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीत यावर्षी प्रथमच रोव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. या पक्षाचे उमेदवार विरेश बोरकर हे सांतआंद्रे मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

विरेश बोरकर हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. ते २८ वर्षांचे आहेत. विरेश यांनी तीनवेळा आमदार राहिलेल्या फ्रान्सिस सिल्व्हेरा यांचा प्रभाव केला आहे. सिल्व्हेरा यांच्यासाठी हा मोठा धक्कादायक पराभव ठरला आहे. आरजीला मात्र पहिल्यांच प्रयत्नात खाते उघडण्यात यश आले आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ आहे. भाजपने १९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा ३ जागांवर तर आम आदमी पक्षाचा २ जागांवर विजय निश्चित आहे.

सध्याच्या कलानुसार गोवा फॉरवर्डला १ जागेवर आणि आरजेपीला १ जागेवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

दरम्यान, भाजपने या निकालानंतर राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांची भेट मागितली आहे. सध्याचे चित्र पाहता भाजपला बहुमत मिळेल असे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत.

त्यादृष्टीने पावले टाकण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे वाळपई मतदारसंघाचे विजयी उमेदवार विश्वजित राणे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news