

राज्यात गाजत असलेल्या आसगाव प्रकरणाने पोलिसांना निलंबित करण्याचे सुरू झालेले सत्र अजून थांबलेले नाही. गेल्या आठवड्यापासून चार पोलिसांचे दोन विविध घटनात निलंबन झाले होते. त्यात आता आणखी तिघांची भर पडली आहे. धारधार शास्त्रांच्या वापराने खून करुन नंतर गाडीखाली फेकलेल्या कन्हैय्या कुमार मंडळ हा बिहारी युवकांच्या खुनाचे प्रकरण हिट एन्ड रन म्हणून नोंद करण्याचा प्रकार नुकताच उजेडात आला होता.
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी तडकाफडकी आदेश काढुन एका हवालदारासह फोंडा पोलीस स्थानकाशी संलग्न असलेल्या एकूण तिघा पोलिसांन निलंबित केले आहे. त्यामुळे विविध घटनात निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांनी संख्या ७ वर पोचली आहे.
गुरुवारी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये फोंडा पोलीस स्थानकावरील हवालदार रवींद्र नाईक , रोबोट पथकातील पोलीस शिपाई अश्विन सावंत , रोबोट वाहनाचे चालक प्रितेश प्रभू यांचा समावेश असुन त्यांच्यावर शिस्तभंगाची करवाई करण्यात आली आहे.
निलंबन काळात त्यांना दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक राखीव विभागात हजेरी लावावी लागणार असून त्यांना पोलिस खात्याचा किट पोलीस स्थानकाकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन आठवड्या पासून निलंबित करण्यात आलेल्या एकूण पोलिसांची संख्या सात झाली आहे.
असागाव प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई सह एक उपनिरीक्षक आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आले होते.महिलेशी गैरवर्तन करण्याच्या आरोपाखाली बुधवारी कोलवा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांना निलंबित करण्यात आले .तर गुरुवारी फोंडा पोलीस स्थानकातील अणखी तिघांना निलंबित करण्यात आले आहे
वरिल तिघा जणांचे निलंबन कन्हैया कुमार प्रकरणाशी निगडित असल्याचे सूत्रांकडुन कळते. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी त्याबाबत अजून स्पष्टीकरण दिलेले नाही.सविस्तर माहिती अशी की एका व्यक्तीचा मृतदेह शिंन्नविच्छिन्न अवस्थेत वेर्णा उद्योगिक वसाहतीजवळ गेल्या बुधवारी आढळून आला होता.
मायणा कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण हिट अँड रन म्हणून नोंद केले होते.त्या युवकाची चौकशी केली असता त्याचे नाव कन्हैया कुमार मंडळ मूळ बिहार आणि सध्या राहणारा फोंडा अशी माहिती मिळाली. त्याला आदल्या दिवशी फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते असे समोर आले होते.पोलिसांनी हिट अँड रन म्हणून प्रकरण नोंद केले असले तरिही शवंचिकित्सेत त्याच्या शरीरावर धारधार शास्त्रांचे १० वार झाल्याचे आढळून आले होते.
निलंबनाच्या यादीत चार पोलिसांची नावे होती. त्यातील एक जण उत्तर गोव्यातील एका वजनदार मंत्र्यांचा खास निघाल्याचे वृत्त असून त्याचे नाव वगळले गेल्यामुळे चर्चाना तोंड फुटले आहे.
शिवाय खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गाडीच्या खाली टाकण्यात आल्याचा अहवालातून समोर आले होते.त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला होता.
तो फोंडा पोलिसांच्या ताब्यातून वेर्णात कसा पोचला, त्याचा खून कोणी केला,फोंडा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या गायब होण्याची तक्रार का नोंदवली असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
दरम्यान। फोंडा पोलीस स्थनकाचे हवालदार आणि रोबोट जीप च्या चालकांची जबानी नोंदवून घेण्यात आली होती. गुरुवारी उशीरा तीन पोलिसांच्या निलंबनाचे आदेश जारी झाले आहेत.