मुंबई-गोवा महामार्गावर एसटीचा अपघात..!

चालका सह १५ ते १६ प्रवाशी जखमी..  जखमींवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
ST accident on Mumbai-Goa highway..!
मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटीचा पनवेल हद्दीतील शिरढोण गावाजवळ पहाटे भीषण अपघात ST Accident File Photo

पनवेल : मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटीचा पनवेल हद्दीतील शिरढोण गावाजवळ पहाटे भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की, एसटी मध्ये प्रवास करणारे 15 ते 16 प्रवाशी जखमी झाले आहेत. या सर्व जखमी प्रवाश्यांवर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी - मुंबई ही एसटी मुंबई गोवा महामार्गावरून गुरुवारी (दि.4) रात्री रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. ही एसटी पनवेल हद्दीतील शिरढोंण गावाजवळ महामार्गावर पुठ्याने भरलेला पहाटे ट्रक पलटी झाला होता. याच वेळी या मार्गावरून मागच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एसटीने या ट्रक ला मागून जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की, एसटीतील जवळपास १५ ते १६ प्रवाशी जखमी झाले. या जखमी प्रवाशांना तत्काळ पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, सर्व प्रवाश्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news