नाशिक : सिडको येथे ६ महिन्याच्या बाळाला पळवून नेण्याचा प्रयत्न

Nashik News
नाशिक येथे लहान बाळाला पळवून नेण्याचा प्रयत्नFile Photo

सिडको : नाशिक जिल्ह्यातील सिडकोतील दत्त चौक येथे बुधवारी (दि.४) दुपारी एका ६ महिन्याच्या बाळाला घरातून एक महिला पळवून नेत असल्याची घटना घडली. मुलाच्या आईने आरडाओरडा केल्याने मुल पळवणारी महिला पळून गेली.

माहितीनुसार, दत्त चौक येथे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कोळी कुटुंबियांच्या घरातून लहान बाळाला पळवून नेण्याचा प्रकार झाला. बुधवारी (दि.४) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मुलाची आई बाळाला झोळीत झोपवून बाथरूम मध्ये गेल्या होत्या. याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेली एक महिला घरात घुसली व तिने बाळाला घेवून जिन्याने नेले. त्याचवेळी बाळाचे तिने तोंड दाबल्याने तो जोरात रडू लागला.

बाळाचा आवाज ऐकून आई बाहेर आली तर महिला बाळाला पळवून नेत होती. यामुळे त्यांनी आरडाओरड केला व बाळाची महिलेकडून सुटका केली. सदर महिला पळून गेली. या मुलाचे वडील सचिन कोळी कंपनीत कामाला गेले होते. सायंकाळी घरी आल्यावर त्यांनी अंबड पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही तपास केला नव्हता. रात्री वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनस्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news