Sepaktakraw World Cup 2027 | सेपक टॅकरो विश्वचषक स्पर्धा 2027 मध्ये गोव्यात होणार आयोजित; 42 देशांचे संघ घेणार सहभाग

Sepaktakraw World Cup 2027 | अध्यक्ष बाबू कवळेकर यांची माहिती; ४२ देशांचे संघ होणार सहभागी
Sepaktakraw World Cup 2027
Sepaktakraw World Cup 2027
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सेपक टॅकरो या खेळाचा देशभरात तसेच गोव्यातही चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर सेपक टॅकरो विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी किंवा मार्च २०२७ मध्ये गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ४२ देशांचे संघ सहभागी होण्याची शक्यता आहे.

Sepaktakraw World Cup 2027
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

अखिल भारतीय सेपकटकरो महासंघाच्या आमसभेने या आयोजनाला मान्यता दिली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली.
कला अकादमीच्या दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने या खेळाच्या विकासासाठी महासंघाला ११ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

या निधीतून देशातील दहा राज्ये आणि चार विभागांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत, असे कवळेकर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला सेपक टॅकरो संधाने कांस्यपदक पटकावले. या संघात गोव्यातील एका खेळाडूचा समावेश होता, असे त्यांनी नमूद केले.

गोव्यातील नावेली येथील मनोहर इनडोअर स्टेडियम, केपे क्रीडा संकुल आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सेपक टॅकरो खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. थायलंडमध्ये झालेल्या किंग्स कप स्पर्धेत भारतीय सेपाकटकरो संधाने रौप्यपदक पटकावले, तर जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले, असे कवळेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या खेळाची दखल घेतली आहे. त्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह आपल्याला चर्चेसाठी बोलावून या खेळाच्या विकासासाठी आणखी काय करता येईल, याबाबतीत विचारणा केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sepaktakraw World Cup 2027
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

सेपक टॅकरो खेळाचा देशभरात विस्तार व्हावा आणि अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर आणि राज्याचे क्रीडा खाते आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहेत, असेही कवळेकर यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशातील ग्वॉल्हेर येथे सेपक टॅकरोच्या राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात झाली असून, गोव्यास ३० संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गोव्याचा संघ चांगली कामगिरी करत असून, तो अंतिम चार संघामध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news