

हणजूण; पुढारी वृत्तसेवा : वागातोर समुद्रकिनाऱ्यावर एका रिसॉर्ट कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२२) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका रिसॉर्टचे तिघे कर्मचारी समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरले होते. त्यातील जीवन दत्ता (वय ३२, रा. दिल्ली) पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. किनाऱ्यावरील एका विदेशी पर्यटकाच्या नजरेस येताच त्याने पाण्यात धाव घेऊन त्याला बाहेर काढले. उपचारासाठी त्याला गोमेकॉत नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हणजूण पोलिस पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :