Latest
Goa covid JN 1: गोव्यात कोविडच्या नवीन व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळले
पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यात कोविड जेएन 1 या व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीतून गोव्याचे आरोग्य मंत्री आणि अधिकऱ्यांसोबत आभासी पध्दतीने बैठक घेतली. Goa covid JN 1
गोव्यात कोविड जेएन 1 या व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळून आले असले तरी एकही रुग्ण रूग्णालयात दाखल केलेला नाही, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री राणे यांनी गोव्यातील नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.

