National Games Goa 2023 : वेटलिफ्टिंगमध्ये गोव्याला रौप्य

National Games Goa 2023 : वेटलिफ्टिंगमध्ये गोव्याला रौप्य

गोवा; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो ग्रॅम वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक मिळाले. गोव्याच्या शुभम वर्माने ३२६ किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली. सेना दलाच्या कोजुमने ३३० किलो उचलून सुवर्ण तर आसामच्या मोहम्मद जमीर हुसेनने कांस्य पदक पटकावले.

जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण आणि कांस्य पदक

महिला गटातील जिम्नॅस्टिक (gymnastics) मध्ये महाराष्ट्राने सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके जिंकली आहेत. संयुक्ता काळे हिने २४.३० गुणांसह अव्वल स्थान मिळवले. तर रीचा चोरडिया २०.३० गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली. हरियाणाच्या अदालखाने २३.१५ गुणांसह रौप्य मिळवले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news