Google Doctor Self Medication Danger | 'गुगल डॉक्टर'वरचा अतिरेकी विश्वास ठरतोय जीवघेणा !

Google Doctor Self Medication Danger | आजच्या डिजिटल युगात कोणतीही माहिती काही सेकंदांत आपल्याला उपलब्ध होते, त्यामुळे आपल्यातील संयम कुठेतरी हरवला आहे.
WhatsApp Privacy Alert
WhatsApp Privacy AlertCanva
Published on
Updated on

पणजी : काव्या कोळस्कर

आजच्या डिजिटल युगात कोणतीही माहिती काही सेकंदांत आपल्याला उपलब्ध होते, त्यामुळे आपल्यातील संयम कुठेतरी हरवला आहे. परिणामी डोकेदुखी, ताप, पोटदुखी असो किंवा मासिक पाळी पुढे ढकलण्याची गरज असो, अनेकजण डॉक्टरांकडे न जाता सर्वप्रथम गुगलवर त्यासंबंधित औषधे शोधतात. त्यानंतर 'गुगल डॉक्टर'ने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून थेट औषधांच्या दुकानातून औषधे विकत घेतात.

WhatsApp Privacy Alert
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

ही वाढती प्रवृत्ती केवळ चिंताजनकच नाही, तर अनेकदा जीवघेणीही ठरत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. आपल्या देशात स्वयं-औषधोपचार करण्याची ही समस्या सातत्याने वाढत असल्याचे विविध वैद्यकीय अभ्यासांत दिसून आले आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता वेदनाशामक, अँटिबायोटिक्स, हार्मोनल गोळ्या, अनेकदा तर स्टेरॉइड्स किंवा इतर औषधांचा वापर केल्याने त्यांचे होणारे दुष्परिणाम जीवघेणे ठरल्याचे दिसून आले आहे.

विशेषतः मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हार्मोनल गोळ्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते. अशाच एका घटनेत महाविद्यालयीन तरुणीने सणाच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मासिक पाळीच्या गोळ्या घेतल्या आणि तिला अगोदरच असलेल्या शारीरिक व्याधीमुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, हार्मोन्सची पातळी, रक्तदाब, रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, गर्भधारणेची शक्यता किंवा इतर आजार वेगवेगळे असतात. एका वरिष्ठ फिजिशियनच्या मते, आजकाल अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येतात तेव्हा त्यांनी आधीच इंटरनेटवरून औषधे सुरू केलेली असतात. त्यामुळे मूळ आजाराची लक्षणे बदललेली असतात आणि योग्य निदान करण्यात विलंब होतो.

काही वेळा ही चूक रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते. आधीच इंटरनेटवरून औषधे सुरू केलेली असतात. त्यामुळे मूळ आजाराची लक्षणे बदललेली असतात आणि योग्य निदान करण्यात विलंब होतो. काही वेळा ही चूक रुग्णाच्या आज गरज आहे ती रुग्णांनी स्वतःहून औषधे घेण्याची सवय सोडण्याची, जुनी प्रिस्क्रिप्शने वापरणे टाळण्याची आणि कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची. कारण आरोग्याची केलेली छोटीशी हेळसांड आयुष्यभराची मोठी चूक ठरू शकते.

WhatsApp Privacy Alert
Cough Syrup Regulations | ‘सिरप’वर नियंत्रण

जुनी प्रिस्क्रिप्शन्स वापरणे कितपत योग्य ?

अनेकजण वर्ष-दोन वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करून पुन्हा त्याच औषधांची खरेदी करतात. मात्र, आजाराची तीव्रता, रुग्णाचे वय, वजन, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड किंवा एकंदरीत शरीराची आणि अवयवांची कार्यक्षमता या सर्व गोष्टी कालांतराने बदलू शकतात. त्यामुळे एकेकाळी योग्य असलेले औषध पुढील वेळी सुरक्षित असेलच, याची कोणतीही हमी नसते.

औषध विक्रेत्यांकडूनही अनेकदा ग्राहकांच्या आग्रहाखातर प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिली जातात. काही जण शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांनी औषधांबद्दल दिलेल्या अनुभवावरूनही औषधे घेतात. मात्र, एका व्यक्तीला उपयोगी पडलेले औषध दुसऱ्या व्यक्तीसाठी अपायकारक ठरू शकते, ही गोष्ट अनेकदा दुर्लक्षित केली.

गुगल तुम्हाला केवळ माहिती देऊ शकते; पण निदान करू शकत नाही. एकाच लक्षणामागे अनेक वेगवेगळे आजार असू शकतात. मात्र सध्याच्या युगात रुग्णांचा डॉक्टरपेक्षा गुगलवरच जास्त विश्वास आहे. पण आरोग्य जपायचे असल्यास अंतिम निर्णय डॉक्टरांचाच असावा. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री व्हायलाच नको.

राजीव कामत, कान, नाक, घसा शल्यचिकित्सक (सर्जन).

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन तसेच फार्मसीमधील औषध विक्रीला आमचा तीव्र विरोध आहे. प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. बीपी, मधुमेहसारख्या काही ठरावीक आजारांची प्रिस्क्रिप्शनेच सहा महिने ते एक वर्षासाठी वैध असतात.

प्रसाद तांबा, सरचिटणीस, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news