Goa Accident Death | पांझरखणी महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Accident Death | पांझरखणी येथील घटना : ... अन्यथा महामार्ग रोखण्याचा इशारा
goa accident death
goa accident death
Published on
Updated on
Summary
  1. पर्यटक टॅक्सीच्या धडकेत दुचाकीस्वार उल्हास गायकवाड यांचा जागीच मृत्यू.

  2. पांझरखणी परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांचा तीव्र रोष.

  3. अपघातानंतर वाहतूक कोंडी; पोलिस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक.

  4. सुरक्षेचे उपाय न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा ग्रामस्थांचा इशारा.

  5. संबंधित टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगाव-कुंकळ्ळी महामार्गावरील पांझरखणी हा भाग मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून पर्यटक टॅक्सीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार उल्हास गायकवाड (वय ४५) यांचा जागीच मृत्यू होण्याची घटना बुधवारी घडली. या घटनेचे पडसाद या परिसरात न उमटले असून पंचनामा करून 7 अपघातग्रस्त वाहने बाजूला करणाऱ्या पोलिसांवर लोकांच्या रेषाला सामोरे जाण्याची वेळ आली.

goa accident death
Goa Casino | तर मांडवीतील कॅसिनो हटवणार

अपघातांचे प्रकार रोखण्यासाठी सरकारकडून 1 उपाययोजना न झाल्यास हा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला जाईल, असा व इशारा नागरिकांनी दिला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटक टॅक्सी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून उल्हास गायकवाड यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांना सुमारे दहा मीटर फरफटत नेले.

हा अपघात इतका भीषण होता की, गंभीर जखमांमुळे रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच प्राण गेला. या दुर्दैवी घटनेचे पडसाद या परिसरात उमटले असून सरकारला अपघात रोखण्यासाठी एखादा गतिरोधक घालता येत नसेल तर सरकारने तसे स्पष्ट करावे, स्वखर्चात गतिरोधक उभारून देऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या अपघातामुळे कुंकळ्ळी आणि मडगाव च्या बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो वाहने महामार्गावर अडकून पडल्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत अपघातग्रस्त गाड्या पंचनामा करून ताबडतोब तिथून काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे आधीच संतापलेले ग्रामस्थ आणखी चिडले होते.

goa accident death
Chimbel Unity Mall | चिंबल येथील युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय

हे प्रकरण आणखी वाढू नये यासाठी कुंकळ्ळी पोलिस स्थानकाची पोलिस कुमक घटनास्थळी तैनात करण्यात करण्यात आली. अपघातानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व पंचनामा पूर्ण करण्यात सुरुवातीला गांभीर्य दाखवले नाही, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

पोलिसांच्या कथित दुर्लक्षामुळे घटनास्थळी नागरिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. याप्रकरणी संबंधित टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे.

goa accident death
Goa Water Issue| गोव्यातील 112 जलस्रोतांपैकी 59 टक्के प्रदूषित; 39 तलाव ‘सर्वात खराब’ श्रेणीत, पर्यावरण अहवालाचा गंभीर इशारा

नागरिकांच्या रोषानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी अखेर पंचनामा करून पुढील तपास प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक डायगो ग्रेशियस यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सुरक्षेचे उपाय करा...

पांझरखणी परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबत संतप्त नागरिकांनी सरकार व संबंधित यंत्रणांना आहे. यापुढे या भागात आणखी अपघात घडल्यास मुख्य रस्ता रोखून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा आणि सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news