Goa Assembly Election | विधानसभा निवडणूक लढवणार; लक्ष्मीकांत पार्सेकरांचे मांद्रेतून पुन्हा रिंगणात उतरण्याचे संकेत

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत
Goa Assembly Election
Laxmikant ParsekarPudahri
Published on
Updated on

Laxmikant Parsekar on Goa Assembly Election

पेडणे : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांद्रे मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग येत असतानाच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय आता जवळजवळ झाला आहे,” असे पार्सेकर यांनी जाहीर केल्याने मांद्रेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

पार्सेकर यांनी आपल्या भूमिकेबाबत सांगितले की, राजकीय जीवनात भाजपसोबत दीर्घकाळ काम केले असले तरी मांद्रे आणि पेडणे परिसराच्या विकासासाठी आपण सुरू केलेले अनेक प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याची खंत आहे .हे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Goa Assembly Election
Goa Assembly Election | वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा युतीच्या आड?

“अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण करायचे आहेत”

मांद्रे आणि पेडणे परिसराच्या विकासासाठी आपल्या कार्यकाळात अनेक योजना व प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी काही प्रकल्प विविध कारणांमुळे पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा सक्रिय राजकारणात उतरण्याची आपली इच्छा असल्याचे पार्सेकर यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.

“मी लढेन आणि मांद्रे व पेडण्याला चांगले दिवस येतील. अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची मला इच्छा आहे,” असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीतील आपली भूमिका केवळ राजकीय पुनरागमनापुरती मर्यादित नसून विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित राहणार असल्याचे संकेत दिले.

Goa Assembly Election
Goa BJP Candidates Assembly Election | आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत पक्षाची भूमिका गुलदस्त्यात

वाढदिवसाला मिळालेल्या प्रतिसादामुळे उत्साह

आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादाचाही पार्सेकर यांनी विशेष उल्लेख केला. मोठ्या प्रमाणावर लोकांनी शुभेच्छा देत आपल्यासोबत असल्याची भावना व्यक्त केल्याने पुढील राजकीय वाटचालीबाबत आपला आत्मविश्वास वाढल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते.

“माझ्या वाढदिवसाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि लोक माझ्यासोबत आहेत, हे स्पष्ट झाले,” असे पार्सेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली आणखी वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Election
Goa Assembly Election | वाढत्या इच्छुकांमुळे विद्यमान आमदार अस्वस्थ; गोव्यात भाजपकडून 7 आमदारांची उमेदवारी धोक्यात?"

मांद्रेतील राजकीय समीकरणे बदलणार?

मांद्रे मतदारसंघात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. अशा वेळी माजी मुख्यमंत्री आणि या मतदारसंघाचे माजी प्रतिनिधी असलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची भूमिका जवळपास निश्चित केल्याने येथील लढत अधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

पार्सेकर प्रत्यक्षात कोणत्या राजकीय व्यासपीठावरून निवडणूक लढवणार, त्यांची पुढील राजकीय रणनीती काय असेल आणि त्यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होईल, याकडे आता मांद्रे मतदारसंघासह संपूर्ण पेडणे तालुक्याचे लक्ष लागणार आहे.

अनुभव विरुद्ध नवी राजकीय समीकरणे

लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्रीपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असल्याने त्यांच्याकडे मोठा प्रशासकीय आणि राजकीय अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचा अंतिम निर्णय घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातील राजकीय संघर्ष अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Election
Goa Assembly Election | भाजपसमोर आपल्या जागा राखण्याचे आव्हान

विशेष म्हणजे पार्सेकर यांनी आपल्या वक्तव्यात “मी जन्मापासून भाजपचा पण सध्या स्वतंत्र आहे” अशी भूमिका मांडल्याने त्यांच्या पुढील राजकीय दिशेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ते स्वतंत्रपणे मैदानात उतरणार की निवडणुकीपूर्वी काही वेगळे राजकीय समीकरण आकार घेणार, हा प्रश्नही आता चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

एकूणच, “मी निवडणूक लढवणार” या लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या स्पष्ट संकेतामुळे मांद्रे मतदारसंघातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्र आणखी रंगतदार झाले आहे. आता त्यांच्या पुढील अधिकृत घोषणेकडे आणि राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news