Goa BJP Candidates Assembly Election | आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत पक्षाची भूमिका गुलदस्त्यात

Goa BJP Candidates Assembly Election | महामंडळधारी माजी भाजप आमदारांचे भवितव्य काय?
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाने ज्या विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार नाहीत किंवा मागील २०२२ च्या निवडणुकीत जे उमेदवार कमी मतांनी पराभूत झालेत त्यांना महामंडळे व स्वायत्त संस्थांवर पदे दिली आहेत.

BJP
Inland Water Sports Ban | अंतर्गत जलक्रीडांना हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाकडून ब्रेक; तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश

या पदांवर राहून ते लोकांच्या संपर्कात राहू शकतील, आपली राजकीय कामे करून घेऊ शकतील, तसेच येत्या निवडणुकीची तयारी करू शकतील, असा विश्वास पक्षाला वाटत आहे. मात्र, ज्यांना महामंडळे किंवा स्वायत्त संस्थांवर संधी दिली आहे, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबतची भाजपची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

उपमुख्यमंत्री राहिलेले आणि केपेतून पूर्वी सलग निवडून येणारे बाबू कवळेकर २०२२ मध्ये पराभूत झाले. कवळेकर यांना कला अकादमीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे ते अनेक कार्यक्रमांत दिसतात.

मांद्रेतून पराभूत झालेले माजी आमदार दयानंद सोपटे यांना बालभवनाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. संत आंद्रेतून फक्त ७० मतांनी पराभूत झालेले माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

हळदोण्यातून पराभूत झालेले माजी आमदार ग्लेन टिकलो यांना गोवा फुटबॉल महामंडळाचे अध्यक्षपद तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाचे सदस्यपद देण्यात आले आहे. शिओलीतून पराभूत झालेले माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना ओबीसी व एससी विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले असून, मडकईतून २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झालेले प्रदीप शेत यांना भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्याचबरोबर अन्य काही नेत्यांना विविध महामंडळांवर नेमण्यात आलेले आहे.

BJP
Sangli News : दीड कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त

त्यामुळे येत्या निवडणुकीत या महामंडळांवर नेमलेल्या माजी आमदारांना व नेत्यांना भाजप उमेदवारी देणार का, ते पाहावे लागेल. या नेत्यांना वाटतेय की भाजपने आपल्याला महामंडळे दिली म्हणजे आपल्यावर पक्षाचा विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा वाटत आहे. काही जणांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीही सुरू केल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

मांद्रेकर, सोपटे, शेत यांची वाटचाल कठीण

शिओलीतून २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या डिलायला लोबो यांनी त्यांचे पती मायकल लोबोसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या विद्यमान आमदार ठरतात. शिओलीतून दयानंद मांद्रेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसते. मांद्रेत भाजप व मगो युती कायम राहिली, तर दयानंद सोपटेना उमेदवारी कठीण आहे. त्याचसोबत प्रदीप शेत यांचे भवितव्यही युतीवर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news