Luthra Brothers Bail Cancel: बर्च अग्निकांड अन् बनवेगिरी प्रकरणात लुथरा बंधू, अजय गुप्ता यांचा जामीन रद्द; HC चे आदेश

Goa Romeo Lane Demolition
Goa Romeo Lane Demolitionpudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लब अग्निकांड प्रकरणातील क्लबचे मालक तथा भागिदार संशयित सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता याना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द करून दणका दिला. उच्च न्यायालयाने तिन्ही संशयितांना दोन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्याना नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची सवलत दिली आहे.

Goa Romeo Lane Demolition
Luthra Brothers Bail | 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लब मालकांचा जामीन धोक्यात! गोवा सरकार हायकोर्टात देणार आव्हान

म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिन्ही संशयितांना मंजूर केलेल्या जामिनाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बर्च अग्निकांड प्रकरणानंतर हणजूण पोलिसांनी तिघांवरही गुन्हा नोंद केला होता तसेच बनावट कागदपत्र तयार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांत तिघांवरही गुन्हा नोंदविण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.

Goa Romeo Lane Demolition
Luthra Brothers Goa ED Action | लुथरा बंधूंना जामीन मिळताच 'ईडी'चा दणका! 17.45 कोटींची मालमत्ता जप्त

६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तपासादरम्यान क्लब चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या नसल्याचे उघडकीस आल्यानंतर हणजूण पोलिसांनी आणि आरोग्य विभागाचे बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ वापरून उत्पादन शुल्क विभागाचा परवाना मिळवल्याचे समोर आल्याने म्हापसा पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता.

Goa Romeo Lane Demolition
Goa Night Club Fire | चार सरकारी अधिकारी निलंबित; मूळ जमीन मालक यूकेला पसार

या दोन्ही प्रकरणांमध्ये हणजूण व म्हापसा पोलिसांनी वेगवेगळी आरोपपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news