Luthra Brothers Goa ED Action | लुथरा बंधूंना जामीन मिळताच 'ईडी'चा दणका! 17.45 कोटींची मालमत्ता जप्त

Luthra Brothers Goa ED Action | हडफडे बर्च अग्निकांड : जामिनानंतर लुथरा बंधूंना ईडीचा पुन्हा झटका
Goa Romeo Lane Demolition
Goa Romeo Lane Demolition
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या आस्थापनाचे मालक लुथरा बंधूंना दोन्ही गुन्ह्यांमध्ये म्हापसा न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकून त्यांना धक्का दिला. ईडीने केलेल्या कारवाईत सुमारे १७.४५ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे.

Goa Romeo Lane Demolition
Goa AI Policy | आयटी क्षेत्रात गोव्याची मोठी झेप; कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणासाठी हालचालींना वेग

सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांना मुनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली तसेच बनावट कागदपत्रांच्या प्रकरणांत जामीन मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण आगीच्या घटनेच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी हणजूण व म्हापसा पोलिस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला होता. या तक्रारीत २५ जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झालेल्या आगीच्या दुर्घटनेबरोबरच, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करून परवानग्या मिळवल्याचा आरोप आहे.

Goa Romeo Lane Demolition
Goa By-Election Cancelled | निवडणूक रद्दप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार

ईडीने केलेल्या तपासादरम्यान उघड झाले की, मे. वियिंग जीएस हॉस्पिटीलीटी गोवा हडफडे एलएलपी या कंपनी मार्फत हे आस्थापन आवश्यक परवानगीशिवाय चालवले जात होते. विशेषतः वैध आग प्रतिबंधक सुरक्षा ना हरकत दाखला नसतानाही व्यवसाय सुरू ठेवण्यात आला, असा आरोप आहे.

तसेच बनावट आरोग्य ना हरकत दाखला आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सादर करून परवाने मिळवण्यात आल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, महत्त्वाचे परवाने कालबाह्य झाल्यानंतरही व्यवसाय सुरूच ठेवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

आस्थापनाचा व्यापार परवाना ३१ मार्च २०२४ रोजी संपला होता, मात्र त्याचे नूतनीकरण न करता नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय चालू ठेवण्यात आला. ईडीच्या तपासानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत या आस्थापनातून सुमारे २९.७८ कोटी रुपयांचे गुन्हेगारी उत्पन्न निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news