Car Fire Goa | क्रॅश बॅरियरला धडकून कारला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर

अपघातानंतर कारने पेट घेतल्याने दुर्घटना
Car Fire
Car Fire Accident Pudhari
Published on
Updated on

Fatal Car Fire Goa

पणजी : गोव्यातील बांबोळी परिसरातील 'फुलांचो खुरिस'जवळ शनिवारी (दि.१) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने ही दुर्घटना अधिक भीषण ठरली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पणजीहून मडगावच्या दिशेने जाणारी कार राष्ट्रीय महामार्गावरून वेगाने जात होती. शिरदोण परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम महामार्गावरील क्रॅश बॅरियरला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार सेवा रस्त्यावर जाऊन आदळली.

Car Fire
Goa Traffic Rule: गोव्यात जाताय... चालकांनो सावधान! एकच चूक आणि आजपासून बसेल दंड

धडकेनंतर कारच्या इंजिनमधून अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कारमध्ये त्यावेळी तीन तरुण प्रवास करत होते. आगीच्या ज्वाळा आणि दाट धुरामुळे त्यांच्यात एकच गोंधळ उडाला.

या दुर्घटनेत एका तरुणाला कारमधून बाहेर पडता न आल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने अन्य दोघांना वेळीच कारमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Car Fire
Goa News : देशात महिला शिक्षकांत गोवा आघाडीवर! UDISE चा अहवाल : राज्यात महिला शिक्षक आणि प्रशिक्षकांची संख्या ८२ टक्के

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news