Goa Flight Cancellation 2026 |इराण-इस्रायल संघर्षामुळे गोव्याचे विमान उड्डाण 'ठप्प'; दाबोळी अ न् मोपा विमानतळावरून अनेक फ्लाईट्स रद्द

Goa Flight Cancellation 2026 | या पार्श्वभूमीवर गोव्याहून आखाती देशाकडे जाणारी बहुतांश विमानसेवा शनिवार, दि. २८ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
Plane
PlanePudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमेरिका व इस्राईल विरुद्ध ईराण यांच्यात युद्ध सुरू असल्याने व इराणतर्फे आखाती देशावर वारंवार विविध माध्यमांतून हल्ले सुरू केल्यामुळे पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याहून आखाती देशाकडे जाणारी बहुतांश विमानसेवा शनिवार, दि. २८ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

Plane
Harsul Murder Case | रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; हरसूल पोलिसांनी पुतण्याला ठोकल्या बेड्या

गल्फ एअरची दाबोळीवरून बहरीन आदी आखाती देशात जाणारी सर्व विमाने दि. २६ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत, तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि कतार एअरवेजने काढलेल्या पत्रकात सांगितले आहे की, अनुक्रमे दुबई आणि दोहासाठीची २८ मार्चपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना परतावा, उड्डाणाचे पुनर्निर्धारण आणि इतर पर्यायांविषयीच्या अद्ययावत माहितीसाठी संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

Plane
CM Pramod Sawant | अफवांवर विश्वास ठेवू नका! मुख्यमंत्र्यांनी स्वतःच व्हिडीओ जारी करून दिली तब्येतीची माहिती

कतारने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोहाला जाणारे आपले उड्डाण रद्द केले आहे. मात्र, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजासाठी एअर अरेबियाची विमानसेवा सुरू आहे. डीजीसीएने विमान कंपन्यांना नऊ पश्चिम ध्रुवांवरील हवाई क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिल्यानंतर विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news