

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुण्यावरून शनिवारी रात्री गोव्यात परतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली. मुख्यमंत्री पुण्याला गेल्यानंतर त्यांनी एका खासगी इस्पितळात तपासणी करून घेतली होती.
त्यानंतर त्यांनी पुण्यामध्येच दोन दिवस विश्रांती घेतली. ते पुण्यात असताना गोव्यामध्ये त्यांची अॅन्जिओप्लास्टी झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ जारी करून आपली तब्येत ठीक असल्याचे सांगत आपण फक्त नियमित आरोग्य तपासणी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी पेयजल खाते व केंद्र सरकार यांच्यात झालेल्या एका भागीदारी करारावर सही करण्याच्या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागही घेतला.