गोव्यातील १५६ पंचायतीच्या निवडणुकासाठी आचारसंहिता लागू

गोव्यातील १५६ पंचायतीच्या निवडणुकासाठी आचारसंहिता लागू

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील १५६ पंचायतीच्या निवडणुकासाठी आचारसंहिता आजपासून ( दि. १६ ) लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष डब्ल्यू. व्ही. रमनमूर्ती व सचिव ब्रिजेस मणेरीकर यांनी पत्रकार परिषदेत पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम घोषित केला.

राज्यातील पंचायतीत इतर मागासवर्गीय (ओबीसी ), अनुसूचित जाती (एससी),  अनुसूचित जमाती ( एसटी) तसेच  महिलांसाठी राखीव प्रभाग यापूर्वीच घोषित करण्यात आले आहेत. पंचायत निवडणुकाचा कार्यक्रमाप्रमाणे १८ जुलै ते २५ जुलै या दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येतील. अर्ज छाननी २६ जुलैला होईल तर २७ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत..

सर्व १९० पैकी १८६ पंचायतीमध्ये १० ऑगस्ट रोजी मतपत्रिकाद्वारे मतदान होणार आहे. त्यानंतर १२ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे रमनमूर्ती यांनी सांगितले. राज्यातील निवडणुका पावसामुळे घेणे शक्य नाहीत. सोबत पावसाळी अधिवेशन असल्यामुळे त्या पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, काही नागरिक उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर दोन्ही न्यायालयानी पंचायत निवडणुका त्वरित घेण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

पंचायत निवडणुकीपर्यंत सर्व पंचायतीवर सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने विधानसभेचे अधिवेशन एका महिन्यावरून १२ दिवसांवर आणले आणि १० ऑगस्टला पंचायत निवडणुका घेण्याचे ठरले. त्यानुसार आजपासून आचारसंहिता सुरू झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news