वर्धा : कापडी बॅग कापून ६० हजार रुपये पळविणाऱ्या दोघांना अटक | पुढारी

वर्धा : कापडी बॅग कापून ६० हजार रुपये पळविणाऱ्या दोघांना अटक

वर्धा : पुढारी वृत्तसेवा : एका व्यक्तीची बॅग कापून ६० हजार रुपये लंपास केल्या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३० हजार रुपये जप्त केले आहे. ही घटना 5 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी नरेंद्र मिश्रा यांनी तक्रार दिली होती.
बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय ६६, रा. केलाबाग, जि. बरेली, उ.प्र.) व अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय ५८, रा. जलालनगर, जि. शहाजापूर उत्तर प्रदेश), अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, भामटीपुरा येथील रहिवाशी नरेंद्र शिवभोजन मिश्रा हे बँकेमध्ये पासबुक प्रिंट करण्याच्या रांगेत उभे होते. ५ जुलै रोजी रांगेत उभे असताना त्यांच्या खांद्यावरील कापडी बॅग नकळत कापून अज्ञात चोरट्यांनी बॅगमधील ६० हजार रुपये लंपास केले. याबाबत मिश्रा यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी बाबुलाल आणि कस्तुरी या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करण्यात आली असून पळविलेल्या रकमेपैकी ३० हजार रुपये जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशान्वये राजेश राठोड, अनुप राऊत, अरविंद घुगे, विकास मुंडे, दिनेश राठोड यांनी केली.
हे ही वाचा:

Back to top button