गोवा निवडणूक : आतापर्यंत निश्चित झालेल्या उमेदवारांमध्ये भाजप आघाडीवर

गोवा निवडणूक : आतापर्यंत निश्चित झालेल्या उमेदवारांमध्ये भाजप आघाडीवर

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa elections) मतमोजणी अद्याप सुरु आहे. काही मतदारसंघातून विजयी उमेदवारांची घोषणा झाली आहे. यामध्ये भाजपची आघाडी दिसून येते आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजीमध्ये आपला गड राखण्यात भाजपला यश आले आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर केवळ ६७४ मतांनी या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. ताळगावमध्येही पुन्हा एकदा जेनिफर यांनी झेंडा रोवला आहे. विश्वजित राणे वाळपई, गणेश गांवकर सावर्डे व नावेलीतून उल्हास तुयेकर या भाजपच्या उमेदवारांना विजयाचा गुलाल लागला आहे. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई देखील फातोर्ड्यातून विजयी झाले आहेत.

काँग्रेसचे अद्याप खाते उघडले नसले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांचा विजय निश्चित झाला आहे. सांताक्रूझ मधून रुडॉल्फ फर्नांडिस आघाडीवर आहेत. सध्या काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : डॉ. राणी बंग : समाज सेवेचा अविरत वसा, महिला दिन विशेष

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news