BJP Founding Day : भाजप कार्यप्रणालीचा जगात बोलबाला

BJP Founding Day : भाजप कार्यप्रणालीचा जगात बोलबाला
Published on
Updated on

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या घरातील परिसरात भाजपचा ध्वज फडकवला. भाजपच्या कार्यपद्धतीचा देशातच नव्हे तर जगातही बोलबाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व भाजप सरकारने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपला दबदबा व विशास संपादन केलेला आहे. देश प्रथम या बरोबरच सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी केलेली कामगिरी तसेच प्रत्येक घरात समृद्धीचा ध्यास यामुळे जनता भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातून विक्रमी आघाडी घेऊन भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासूनच सज्ज असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
'आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा'साठी आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू. राज्याला नवी उंची मिळवून देण्यासाठी भाजपची टीम व कार्यकर्ते अधिक सक्षमपणे कार्यरत राहतील, असा संकल्प मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

काँग्रेसमुक्‍त भारत'चा नारा यशस्वी

काँग्रेसमुक्त भारतचा नारा यशस्वी होत आहे. भाजपची ध्येय-धोरणे घरोघरी पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करीत आहेत. जागतिक स्तरावर देशाला उंची मिळवून देण्यात भाजप नेत्यांनी मोठी कामगिरी केली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news