नाशिक : तो मृतदेह अपघाताआधीचा ; रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा खुलासा | पुढारी

नाशिक : तो मृतदेह अपघाताआधीचा ; रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा खुलासा

नाशिक/जळगाव : पुढारी वृत्तसेवा
देवळालीजवळ पवन एक्स्प्रेसचे 11 डबे घसरून झालेल्या अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. तेथे आढळून आलेला मृतदेह अपघाताआधीच घटनास्थळी होता, असा खुलासा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी ‘पुढारी’शी बोलताना ही माहिती दिली. रविवारी झालेल्या या अपघातात तीन जण जखमी झाले. त्यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करून त्यांना घरी रवाना करण्यात आले. तर तिसर्‍या जखमीचा पाय फ्रॅक्चर असून, त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत, असे मानसपुरे यांनी सांगितले.

याशिवाय रेल्वेच्या पुणे विभागाने म्हटले आहे की, अपघातस्थळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, त्या मृतदेहाबाबत रेल्वे प्रवाशांपैकी कोणीही पुढे आले नाही. संबंधित व्यक्ती रेल्वेतून प्रवास करीत असल्याची पुष्टीदेखील झालेली नाही. हा मृतदेह रेल्वे दुर्घटना होण्याअगोदरपासून घटनास्थळी असावा.

हेही वाचा :

Back to top button