Goa- बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, भाड्याच्या फ्लॅटमध्ये घेतला गळफास

Goa- बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, भाड्याच्या फ्लॅटमध्ये घेतला गळफास
hanging case
hanging casePudhari News Network
Published on
Updated on

BITS Pilani student end of life in rented flat

दाबोळी : मूळ केरळ आणि सध्या बिट्स पिलानीमध्ये पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी अर्जुन साबू याने कॅम्पसच्या मागे असलेल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरामुळे पुन्हा एकदा बिट्स पिलानीचा कारभार चर्चेत आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबू हा पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

तो संस्थेच्या कॅम्पसमागे असलेल्या 'आकार हाइट्स' अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. घटनास्थळावर सुसाइड नोट सापडली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांवर येणाऱ्या दबावाविषयी पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. बिट्स पिलानी मधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची मालिका सुरूच आहे.

hanging case
Chilli prices rise in Goa during monsoon preparations | पावसाळ्याची बेगमी, मिरची महागली

२०२४ पासून आतापर्यंत बिट्स पिलानीत झालेले मृत्यू

११ डिसेंबर २०२४ : गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील २० वर्षीय विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या १ मे २०२५ : लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील कृष्णा कासेरा याची आत्महत्या ५ मार्च २०२५ : गोव्यातील अथर्व देसाई या २० वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या १६ ऑगस्ट २०२५ : कुशाग्र जैन (उत्तर प्रदेश) या

विद्यार्थ्यांचा गूढ मृत्यू

४ सप्टेंबर २०२५ : कर्नाटक येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या २ फेब्रुवारी २०२६ : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी जिटेश या २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. १३ मे २०२६ अर्जुन साबू या केरळचा २६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

hanging case
Engineers and lawyers competing for police constable posts - पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी अभियंता, वकीलही स्पर्धेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news