Chilli prices rise in Goa during monsoon preparations | पावसाळ्याची बेगमी, मिरची महागली

Chilli prices - गावठी मिरची हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो
Chilli prices
Chilli prices
Published on
Updated on

पणजी :घराघरात पावसाळ्यात लागणाऱ्या जीवनावश्यक सामानाची बेगमी सुरू झाली आहे. पावसाळ्यात जेवणासाठी लागणारा मसाला तयार करणे हा महिलांच्या आवडीचा विषय. मात्र, यावर्षी मसाल्याच्या मिरचीचा भाव खूप वाढला आहे. स्थानिक गावठी मिरची तब्बल एक हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यासोबतच ब्याडगी मिरची ६०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यासोबतच इतरही विविध प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत.

आता पावसाळा काही आठवड्यांवर येऊन ठेपल्याने मिरच्या आणि मसाल्याच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. मिरचीसोबत लसूण आणि मसाल्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे अनेकांना बाजारात पाकिटातून विकली जाणारी मिरची पावडर घेणे परवडणारे वाटत आहे.

Chilli prices
Engineers and lawyers competing for police constable posts - पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी अभियंता, वकीलही स्पर्धेत

तथापि, पारंपरिक पद्धतीने घरी मिरच्या वाळवून मसाला बनवणे आणि जेवणाची लज्जत वाढवणे यातील आनंद वेगळाच असतो. त्यामुळे महाग असली, तरी मिरचीला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत.

Chilli prices
Fishing Boat Sinks Goa | बेतुल समुद्रात मासेमारी बोट बुडाली! दीड कोटींचे नुकसान

कोकमही खाताहेत भाव

माशाच्या कढीसाठी व अन्य शाकाहारी, मांसाहारी खाद्य पदार्थात वापरली जाणारी कोकम सोले सध्या भाव खात आहेत. त्यांचा दर तब्बल ३०० रुपये पावकिलो आणि हजार रुपये किलो असा आहे. यंदा कोकमचे पीक कमी आल्याने दरवाढ झाली आहे. कोकम आगळ १५० ते २०० रुपये प्रतिलिटर दराने विकला जात आहे. चिंच ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. यासोबतच बाजारात सुकी मासळी, उकडे तांदूळ, अळसांदे व इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news