कोकण रेल्वेकडून ४,६२३ प्रवाशांसाठी एसटी बस वाहतुकीची व्यवस्था

गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्‍वेकडून १०१ एसटी बसेसची सोय
Arrangement of ST bus transport for 4,623 passengers by Konkan Railway
कोकण रेल्वेकडून ४,६२३ प्रवाशांसाठी एसटी बस वाहतुकीची व्यवस्था Pudhari Photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक खोळंबले असून बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली आहे. गोव्यासह महाराष्ट्रातील विवीध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी कोकण रेल्वेने १०१ एसटी बसेस मागवल्या असून, गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या ८ रेल्वेतील एकूण ४,६२३ प्रवाशांना इच्छित स्थळी रवाना करण्यात सुरू केली आहे.

Arrangement of ST bus transport for 4,623 passengers by Konkan Railway
Goa Rain Update | गोव्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; कोकण रेल्वेकडून तीन गाड्या रद्द

कोकण रेल्वेने गाड्यांचे वेळापत्रक पुनर्संचयित केले असून ट्रेन क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल एच निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास १६ जुलै २०२४ रोजी सुरू होणारे नियोजित निर्गमन दुपारी २.०० वाजता सुटण्यासाठी पुन्हा शेड्यूल केले आहे. १७ जुलै रोजी पहाटे ४ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल सुटणार आहे.

Arrangement of ST bus transport for 4,623 passengers by Konkan Railway
Goa Assembly Monsoon Session : अखेर माफीनाम्याच्या विषयावर मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून पडदा

ट्रेन क्रमांक १२२८३ एर्नाकुलम जंक्शन. एच निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास सुरू १६ जुलै २०२४ एर्नाकुलम जंक्शन सोडण्यासाठी नियोजित आहे.

Arrangement of ST bus transport for 4,623 passengers by Konkan Railway
Goa Assembly Monsoon Session : 'काळे कपडे परिधान करणाऱ्यांना विधानसभेत प्रवेश नाही'

येथे १७ रोजी रात्री १ वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या गैरसोयीबद्दल कोंकण रेल्वेने दिलगीरी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news