Goa Rain Update | गोव्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; कोकण रेल्वेकडून तीन गाड्या रद्द

गोव्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; राज्‍यात पूरसदृष्‍य परिस्‍थिती
Record breaking rains in Goa; Three trains canceled by Konkan Railway
गोव्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; कोकण रेल्वे कडून तीन गाड्या रद्दFile Photo

पणजी : गोव्यात जोरदार पाऊस सुरूच आहे. राज्‍यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्‍थाही ठप्प झाली आहे. दरम्‍यान हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेवरही परिणाम झाला असून आल (मंगळवार) कोकण रेल्वेच्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्‍या आहेत. (Goa Rain Update)

Record breaking rains in Goa; Three trains canceled by Konkan Railway
जम्मू-काश्मिरमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

राज्यात पावसाचा जोर कायम असून १ ते १६ जुलै या काळात ८४ इंच पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस ४५ टक्के जास्त आहे. राज्यातील सर्व धरणे भरली असून, अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग ही सुरू झाला आहे. या पावसामुळे कोकण कन्या, तुतारी आणि जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. (Goa Rain Update)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news