Goa Assembly Monsoon Session : अखेर माफीनाम्याच्या विषयावर मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून पडदा

आमदार एल्टन डिकॉस्टांनी सभापतींचा अवमान केल्‍यावरून दोन दिवस विधानसभेत गदारोळ
Goa Assembly Monsoon Session
Goa Assembly Monsoon Session : अखेर माफीनाम्याचा विषयावर मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून पडदाPudhari Photo

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सभापतींचा अवमान केल्याप्रकरणी गेले दोन दिवस विधानसभायेत सुरू असलेला गदारोळ अखेर मुख्यमंत्र्यांनी आज संपविला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आमच्याकडे केवळ बहुमत आहे म्हणून आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी माफी मागावी असा आमचा आग्रह नव्हता, तर सभापती खुर्चीचा सन्मान कायम राहावा यासाठी ही मागणी आम्ही लावून धरली होती. आम्ही हा विषय येथे संपवतो असे म्हणत या विषयावर त्‍यांनी पडदा टाकला.

Goa Assembly Monsoon Session
गोवा विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

आमदार डिकॉस्टा यांनी सभापतींचा अवमान केल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत होता. सभागृहात दुसऱ्या दिवशीही हा विषय सत्ताधारी आमदारांनी लावून धरला. मात्र आमदार डिकॉस्टा आणि विरोधी पक्षनेते युरी आले मग यांनी माफी मागणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे या मुद्द्यावरून काल आणि आज चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते.

Goa Assembly Monsoon Session
Goa Rain Update | गोव्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; कोकण रेल्वेकडून तीन गाड्या रद्द

या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हा विषय संपल्याचे सांगून विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news