पणजी : काळे कपडे परिधान करणाऱ्यांना विधानसभेत प्रवेश नाही : सभापतीFile Photo
गोवा
Goa Assembly Monsoon Session : 'काळे कपडे परिधान करणाऱ्यांना विधानसभेत प्रवेश नाही'
गेल्या अधिवेशनात ठराव घेण्यात आल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले
पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभेत काळे कपडे परिधान करून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही काळे कपडे परिधान करून येऊ नये असे निर्देश आपण दिले आहेत. काळे कपडे परिधान करून येणाऱ्यास विधानसभेत प्रवेश दिला जात नसल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.
विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजात सभापती तवडकर यांनी ही माहिती दिली. सभापती तवडकर म्हणाले, विधानसभेत काळे कपडे परिधान करून कोणालाही प्रवेश देऊ नये. यासंदर्भातील चर्चा गेल्या अधिवेशनात झाली होती. त्यावेळी काळे कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश देऊ नये असा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेत काळे कपडे परिधान करून येणाऱ्यास प्रवेश दिला जात नसल्याचेही ते म्हणाले.

