मडगाव येथे दरडीसह सुरक्षा भिंत इमारतीवर कोसळली

इमारतीतील ८ कुटुंबांचे स्थलांतर
 security wall collapsed in Madgaon
खारेबांध मडगाव येथे रहेजा रेसिडन्सी समोरील सुरक्षा भिंत कोसळली.Pudhari News Network

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : खारेबांध मडगाव येथे रहेजा रेसिडन्सी समोरील सुरक्षा भिंत कोसळली. भिंतीच्या लागतचा डोंगर घसरला आहे. कोसळलेली सुरक्षा भिंत इमारतीवर आदळल्याने इमारतीतील चार फ्लॅटचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, जीवितहानी झाली नसून या इमारतीतील ८ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

 security wall collapsed in Madgaon
गोवा विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

मंगळवारी (दि. १६) सकाळी सुमारे आठ वाजता मार्ले बोर्डा येथील रायेश चेंबर्स या इमारतीच्या बाजूला बांधण्यात आलेली संरक्षक भिंत दरडीसह खाली घसरली. व इमारतीवर पडली. या दुर्घटनेत चार फ्लॅटमधील साहित्य मिळून सुमारे १८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

 security wall collapsed in Madgaon
Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून ब्लॉक

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीकडून जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकेकडे या संरक्षक भिंतीसंदर्भात तक्रारी केलेल्या होत्या. मात्र ती खासगी जागेत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते. आपात्कालीन यंत्रणेकडून दिलेल्या एकाही क्रमांकावरुन प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेनंतर मामलेदार व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मातीचा भराव हटवण्याच्या सूचना दिल्या.

 security wall collapsed in Madgaon
Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक बंदी, हे आहे कारण..

दरम्यान, याच इमारतीच्या बाजूला आणखी एक धोकादायक संरक्षक भिंत असून रहिवाशांना धोका कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे आठ कुटुंबियांना सद्या स्थलांतरित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news