Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून ब्लॉक

पुईनजीक पुलाचे गर्डर बसविण्यासाठी 3 दिवस चालणार काम
Mumbai-Goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून ब्लॉकpudhari photo

रायगड/कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 कोलाड (पुई) येथील महिसदरा नदीवरील नवीन पुलावर गर्डर बसविण्याचे काम करण्यासाठी यंत्रणा सज्य झाली असुन गुरुवार 11 ते शनिवार 13 जुलै पर्यंत हे काम करण्यात येणार असून या कामामुळे या मार्गाने येणारी जाणारी वाहतूक चार तास बंद करण्यात येणार असुन ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ दुपार दोन सत्रांत ब्लॉक

रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे.

वाहतूक वळविली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई व गोवा वाहिनीवर म्हैसदरा नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम 11 जुलै ते 13 जुले रोजी सकाळी 6 वा. ते 8 व दुपारी 2 वा. ते 4 वा. घ्या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजीत कामाचे वेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर मुंबई व गोवा वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, वाहन चालकांची गैरसोय तथा वाहतूक सुरळीत व सुनिश्चीत राहणेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणार्‍या प्रवाशांसाठी वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे पुन्हा मुंबई- गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

प्रशासनाचे आवाहन

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news