गोवा विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूबFile Photo
गोवा
गोवा विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब
आमदार एल्टन डिकोस्टा यांनी सभापतींवर केलेल्या आरोपावरून सभागृहात गोंधळ
पणजी : पुढारी वृत्तसेवा
आमदार एल्टन डिकोस्टा यांनी सभापतींवर केलेल्या आरोपावरून आज (मंगळवार) सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा आजही स्थगित करण्यात आले.
सत्ताधारी आमदार एल्टनने माफी मागावी या मागणीवर ठाम. एल्टन यांचा माफी मागण्यास नकार. विरोधकांची प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली. विरोधीपक्षनेते युरी आलेमाव व आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर नवा पायंडा घालत असल्याचा आरोप केला.

