Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक बंदी, हे आहे कारण..

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

On the Mumbai-Goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक बंदीpudhari photo

रायगड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई व गोवा वाहिनीवर पुई येथील म्हैसदरा नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम होणार असल्याने 11 जुलै ते 13 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 व दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावर धावणार्‍या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.


On the Mumbai-Goa highway
रायगड : पुराच्या पाण्यातून चालत येताना तरूणाचा व्हिडिओ व्हायरल!

हलकी, जड-अवजड सर्व वाहतुक राहणार बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई व गोवा वाहिनीवर कल्याण टोल इन्फा. कंपनीतर्फे पुई येथील म्हैसदरा नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम 11 जुलै ते 13 जुले रोजी सकाळी 6 वा. ते 8 व दुपारी 2 वा. ते 4 वा. घ्या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजीत कामाचे वेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर मुंबई व गोवा वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग

पर्यायी मार्गांमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई ते गोवा वाहिनीवर (मुंबईहुन गोळाकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या वाकण फाटा येथुन भिसे खिंड-रोहा-कालाड वरुन वळवुन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ग्रा. 66 या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रा. 66 वरूण मुंबई से गोवा वाहिनीवर (मुंबईहुन गोव्याकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या चाकण फाटा येथुन पाली-रवाळजे कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.

खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 ए मर्गावरून मुंबई ते गोवा वाहिनीवर (मुंबईहून गोव्यावाडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवुन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरून गोवा ते मुंबई वाहिनीवर (गोव्याहून मुंबईकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या कोलाड येथुन कोलाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 असे मार्गस्थ करता येतील. गोवा ते मुंबई वाहिनीवर (गोावाहून मुंबईकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या कोलाड येथुन रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 ए मार्गावरून मार्गस्थ करता येथील असे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news