

पणजी : पर्यटकांसाठी अगदी आवडीचे ठिकाण म्हणजे गोवा होय. गोव्यातील सुंदर समुद्र किनारे, जुने चर्च आणि तिथली संस्कृती जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. याच गोव्यात एक लहानसं अभयारण्यही आहे. गोव्याला कधी गेला तर हे अभयारण्य न चुकता पाहा. गोव्यातील बोंडला वन्यजीव अभयारण्य फक्त ८ चौरस किलोमीटर इतकं लहान आहे. फोंडा तालुक्यात सहज पोहोचता येईल असे हे अभयारण्य आहे.
हे अभयारण्य लहान असल्याने एक दिवसाच्या लहान ट्रीपसाठी तसेच एखाद्या मुक्कामसाठी अगदी चांगले ठिकण आहे.
प्राणी आणि वैविध्य वनस्पती इथले वैशिष्ट्य म्हणता येईल. या ठिकाणी प्राणी संग्रहालय, डीअर सफारी पार्क, बॉटनिकल गार्डन आणि नेचर इंटरप्रिटेशन सेंटर ही इथली वैशिष्ट्यं आहेत.
हे अभयारण्य उत्तर गोव्यातील फोंडा तालुक्यात आहे. पणजी आणि मार्गो अशा दोन्ही ठिकाणाहून येथे जाता येते. मार्गोपासून जवळपास ३८ किलोमीटर तर पणजीपासून ५० किलोमीटरवर हे अभयारण्य आहे. दोन्ही ठिकाणाहून टुरिस्ट बसेसही उपलब्ध होतात.
वर्षभरात कधीही या अभयारण्याला भेट देता येते. ऑक्टोबर ते मार्च आणि त्यानंतर पावसाळ्यात येथे पर्यटकांची जास्त गर्दी असते.
हे अभयारण्य सोमवारी बंद असते इतर वेळा संपूर्ण वर्षभर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या अभयारण्यात भेट देता येते. पुरुष आणि लहान मुलांना प्रवेशासाठी तिकिट आहे.
[tie_full_img]
[/tie_full_img]
गवा, सांबर, बिबटे. रामडुकर, रानमांजर, शेखरू असे प्राणी येथे दृष्टीस पडतात. हे अभयारण्य पक्ष्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच अभयारण्यात एक लहानसे प्राणीसंग्रहायलही आहे.येथ वाघ, हत्ती, अस्वल, मगरी, साप असे वन्यप्राणी आहेत.
घरातील सर्वांसाठी काही ना काही असलेले हे अभयारण्य आहे. त्यामुळे गोव्यात एक दिवस घालवायचा असेल तर बोंडला अभयारण्याला आवश्य भेट द्या.
हेही वाचा